मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023/ CM SAUR KHISHI PUMP YOJANA

Table of Contents

            मित्रांनो आज आपण भारत सरकारच्या एका महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल माहिती घेणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना2023/CM SAUR KHISHI PUMP YOJANA जीवन जगत असताना जशी मनुष्य प्राण्याला पाण्याची आवश्यकता आहे. तशीच आपल्या शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठी पाण्याची तितकीच नितांत गरज आहे. पाण्यासाठी विजेची ही तितकीच आवश्यकता आहे. पूर्वीच्या काळात शेतीमध्ये पाण्यासाठी इंधनावर चालणारे साधने पंप वापरले जायचे किंवा बैलाच्या सहाय्याने मोट च्या माध्यमातून पाणी शेताच्या वापरासाठी काढले जायचे. वेळेबरोबर विहिरी वरती उपनलिकेवरती विजेचे पंप आले आणि शेतकऱ्यांना पाणी उपसा करण्यासाठी विजेची गरज भासू लागली.  लोड शेडिंग, दिवसभर शहरासाठी वीज रात्री ग्रामीण भागासाठी वीज या सर्व कारणामुळे शेतकऱ्याला पाणी उपसा करण्यासाठी खूप कमी वेळ शिल्लक राहतो.

         या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी सरकारची मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना /CM SAUR KHISHI PUMP YOJANA  सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळणार आहे. सूर्य हा ऊर्जेचा मुख्य स्त्रोत आहे.  ही ऊर्जा पारंपारिक / नैसर्गिक आहे. त्याचा कितीही वापर केला तरी ती न संपणारी ऊर्जा आहे. य सौर पॅनलच्या साह्याने सौर ऊर्जा पासून शेतीपंपासाठी वीज  निर्माण करून शेतीमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारची ही महत्त्वकांक्षी योजना शेतकऱ्यांना मिळणार आहे. वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठा, तांत्रिक अडचणी , विद्युत अपघात यासारख्या समस्या पासून सुटका होणार आहे . अखंडित आणि शाश्वत विद्युत पुरवठा होण्यासाठी सौर ऊर्जा ही संजीवनी आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप उपलब्ध करून दिल्यास यामधून शेतकऱ्यांचे खूप मोठे सहाय्य होणार आहे.

 • मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना व उदिष्ठ /CM SAUR KHISHI PUMP YOJANA MOTO

महाराष्ट्र राज्य अटल सौर कृषी पंप योजना राज्य सरकारद्वारे राज्यात एक लाख सौर कृषी पंप स्थापित करण्यासाठी विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतूद केलेली आहे. अनुसूचित जाती ,जमाती, आदिवासी अशा लाभार्थ्याकर्ता हा निधी वापर करून नवीन सौर कृषी पंप योजना करण्यात मान्यता दिली आहे. शेतकऱ्याला दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे यासाठी राज्य सरकार द्वारे सबसिडीपोटी सौर पंप शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्यात उपलब्ध करून देण्याचा शासनाचा उद्देश आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही संपूर्ण महाराष्ट्र सरकारची योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत तीन वर्षाच्या कालावधीत जवळजवळ एक लाख सौर कृषी पंप  देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे पहिल्या टप्प्यात 25000 दुसऱ्या टप्प्यात 50000 तिसऱ्या टप्प्यात 25000 सौर कृषी पंप  देण्याचे शासनाचे उद्दिष्ट प्रत्यक्ष सुरू झाल्यापासून 18 महिन्यात राबविण्यात येईल.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023/ CM SAUR KHISHI PUMP YOJANA
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023/ CM SAUR KHISHI PUMP YOJANA
 • मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना चे वैशिष्ट /CM SAUR KHISHI PUMP YOJANA’S FEACHARSE

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत महाराष्ट्र सरकार सौर कृषी पंपाच्या किमतीच्या 95 टक्के अनुदान देणार आहे. आणि लाभार्थ्याला फक्त पाच टक्के रक्कम भरावयाची आहे. या योजनेअंतर्गत 5 एकरापर्यंत जमीन असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना 3 एचपी पंप देण्यात येईल. आणि 5 एकरापेक्षा अधिक शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्याला 5 एचपी किंवा 7.5 एचपी पंप देण्यात येईल. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेअंतर्गत राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.

 • मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना चा फायदा व उद्देश /CM SAUR KHISHI PUMP YOJANA’S  BENEFITS

राज्यात आज पण अनेक भागांमध्ये शेतकरी हा पारंपारिक डिझेल पंप इलेक्ट्रिक पंप वापरतात. त्यासाठी इंधन म्हणून डिझेलचा वापर केला जातो. डिझेलच्या वाढत्या किमती विचारात घेता शेतकऱ्यांना सिंचन करण्यासाठी बराच खर्च करावा लागतो आहे. या सर्व बाबीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते आहे त्या नुकसानापासून वाचवण्यासाठी शेती सिंचनाचा प्रश्न मिटवणे आणि पर्यावरण सुधारणे हा उद्देश या सौर कृषी पंप योजना 2023 योजनेचा आहे.

महाराष्ट्र राज्यात अतिदुर्गम भाग, विदर्भ यामध्ये आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी या योजनेचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांनी  भरावयाचा हिस्सा कमीत कमी ठेवून उर्वरित रक्कम वित्तीय संस्थेमार्फत कर्ज स्वरूपात देण्यात येईल. या कर्जाची परतफेड महावितरण कंपनी द्वारे टप्प्याटप्पाने करण्यात येईल. या योजनेअंतर्गत सर्वसाधारण लाभार्थ्या करता सौर कृषी पंपाच्या केंद्रीय आधारभूत किमतीच्या 10 टक्के आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना 5 टक्के हिस्सा राहील.

 • महाराष्ट्र राज्य कृषी पंप योजना 2023/CM SAUR KHISHI PUMP YOJANA मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे. यासाठी शासनाने काही निकष ठरवून दिलेले आहेत. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी हे पात्रता निकष माहीत असणे आवश्यक आहे.

 1. सौर कृषी पंप योजनेचा लाभ मिळवण्यासाठी त्या शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध असला पाहिजे. अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेसाठी पात्र ठरवले जाईल, परंतु या शेतकऱ्याकडे पारंपारिक पद्धतीने विद्युत कनेक्शन नसणे आवश्यक आहे.
 2. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्याचे क्षेत्र 5 एकरापर्यंत आहे. अशा शेतकऱ्यांना 3 एचपी आणि 5 एकरापेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 5 किंवा 7.5 एचपी कृषी पंप देण्यात येईल.
 3. या योजनेअंतर्गत विद्युत कनेक्शन नसलेले शेतकरी किंवा वन विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी महावितरण कंपनीकडे विद्युत कनेक्शन कनेक्शन साठी पैसे भरूनही प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांपैकी किंवा नजीकच्या काळात विद्युत कनेक्शन मिळत नाही असे शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, महाराष्ट्र शासनाच्या धडक सिंचन योजना अंतर्गत लाभ घेणारे शेतकरी या सदराखालील सर्वांना या योजनेमध्ये प्राधान्य राहील.
 4. वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे असणारे शेतकरी शेत जमिनीच्या जवळून नदी नाले वाहत असणारे शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र असते असतील.
 5. सौर कृषी पंप योजनेसाठी सर्वसाधारण गटाच्या शेतकरी लाभार्थ्याकडून 10 टक्के आणि अनुसूचित जाती आणि जमाती लाभार्थ्याकडून 5 टक्के याप्रमाणे लाभार्थी हिस्सा भरणे आवश्यक राहील.
 • मुख्यमंत्री सौर कृषी पंप/CM SAUR KHISHI PUMP YOJANA योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण जबाबदारी महावितरण कंपनीला दिलेली आहे जिल्हास्तरावर जिल्हा समिती स्थापन करण्यात आली आहे त्यामध्ये समिती सदस्य खालील प्रमाणे:

 1. जिल्हाधिकारी- अध्यक्ष
 2. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार महसूल विभाग- सदस्य
 3. जिल्हा अधीक्षक, कृषी विभाग- सदस्य
 4. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण- सदस्य
 5. वरिष्ठ वैज्ञानिक भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा – सदस्य
 6. प्रकल्पाधिकारी, आदिवासी विकास विभाग – सदस्य
 7. अधीक्षक अभियंता, महावितरण – सदस्य सचिव
 8. विभागीय महाव्यवस्थापक, महाऊर्जा- सदस्य
 • महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023/CM SAUR KHISHI PUMP YOJANA या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी योजनेमध्ये अर्ज करणे आवश्यक आहे त्यासाठी कागदपत्रांची आवश्यकता खालील प्रमाणे राहील.

 1. अर्जदाराचे आधार कार्ड
 2. शेतीचे कागदपत्र
 3. रहिवासी प्रमाणपत्र
 4. बँक पासबुक
 5. मोबाईल नंबर
 6. ओळखपत्र
 7. पासपोर्ट साईज फोटो आणि
 8. सातबारा
 • मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023/CM SAUR KHISHI PUMP YOJANA ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया:

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी राज्य सरकारने वेबसाईट पोर्टल बनवले आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी या वेबसाईटवरून अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.

वेबसाईट:

http://www.mahadiscom.in/solar/intex.html

निष्कर्ष:

आज आपण  मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023/ CM SAUR KHISHI PUMP YOJANA याची माहिती घेतली, हि योजना शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात फायदा करून देणारी आहे ना विजेची गरज ना विजेसाठी पैशाची जेव्हा जावू तेव्हा पाणी पुरवठा चालू, सकाळ पासून सौर पंप चालू राहतो. विजेची वेळेची अनिश्चितता त्याच बरोबर तांत्रिक अडचणी मुले पिकाचे नुकसान होणार नाही. शेतकरी त्याच्या सोयीनुसार पाणी पुरवठा नियोजन करता येते. माहिती कशी वाटला कमेंटस करा , धन्यवाद.

हे पण वाचा:

https://marathisarathi7.com/pm-kisan-tractor-yojana-2023/

 

 

 

3 thoughts on “मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023/ CM SAUR KHISHI PUMP YOJANA”

 1. Pingback: सचिन
 2. Pingback: sharad

Leave a Comment