माझी कन्या भाग्यश्री योजना २०२३ | Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023

माझी कन्या भाग्यश्री योजना | Majhi Kanya Bhagyashree Yojana मित्रांनो, राज्य सरकार व केंद्र सरकार देशातील, राज्यातील नागरिकांसाठी काही योजना राबवत असते, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शिक्षण, आरोग्य, समृद्धी यासाठी सरकारकडून बऱ्याच योजना राबवल्या जातात. त्याप्रमाणे समाजातील स्त्री वर्गासाठी, मुलींसाठी सरकारकडून बऱ्याच योजना राबवल्या जातात. त्यांच्या उच्च शिक्षणासाठी, चांगल्या आरोग्यासाठी त्यांना वैद्यकीय सुविधा मिळाव्यात … Read more

Shravan Bal Yojana 2023 | श्रावण बाळ योजना 2023

श्रावण बाळ योजना 2023 | Shravan Bal Yojana 2023

श्रावण बाळ योजना 2023 | Shravan Bal Yojana 2023

    मित्रांनो, आपण आज श्रावण बाळ योजना २०२३ | Shravan Bal Yojana 2023 या सरकारच्या योजनेची सविस्तर माहिती पाहूया. भारत देश हा कृषिप्रधान देश आहे त्यामुळे आपल्या कडे बहुतांश लोक हे ग्रामीण भागात राहतात, आणि त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक दुर्लभ आणि गरीब सामान्य नागरिक यांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. अशा लोकांसाठी महाराष्ट्र राज्य सरकार वेगवेगळ्या स्तरावर आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि वंचित निराधार नागरिक यांना आर्थिक सहाय्य म्हणून काही योजना बनवत असते. अशा बहुसंख्य कुटुंबाकडे जीवनावश्यक आणि मूलभूत वस्तूंची कमतरता असते. बहुसंख्य नागरिक दारिद्र रेषेखाली जीवन जगतात. अशा परिवारात  वृद्धापकाळात  नागरिकांना दुर्लक्षित केले जाऊ नये किंवा अशा ज्येष्ठ नागरिकांना समाजात जीवन जगणे कठीण होऊ नये यासाठी आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून महाराष्ट्र शासनाने श्रावण बाळ योजना राज्यात राबवली आहे.

 • श्रावण बाळ योजना २०२३ | Shravan Bal Yojana 2023 योजनेचे उद्दिष्ठ 

आपल्या राज्यातील वय वर्ष ६५ व ६५ वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिक यांना अर्थसहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबवली आहे. महाराष्ट्र सरकार द्वारे नेहमीच राज्यातील नागरिकांसाठी उपयोगी कल्याणकारी योजना या राबवल्या जातात या योजनेमध्ये समाजातील कमी उत्पन्न असलेले, वंचित नागरिक, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, त्याचबरोबर निराधार ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य  नागरिक यांचे जीवनमान सुधारणे व त्यांना आर्थिक सुरक्षित करणे तसेच त्यांच्या आरोग्य विषयी सुविधा निर्माण करून देणे त्यांना समाजात जगताना जीवन जगण्यासाठी पाठबळ दिले हे शासनाचे मुख्य उद्दिष्ट असते त्यासाठी श्रावणबाळ योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार दरमहा ६०० रुपये नागरिकांना वृद्धापकाळात निवृत्ती वेतन स्वरूपात देत आहे.

श्रावण बाळ योजना 2023 | Shravan Bal Yojana 2023
marathi sarathi
 • महाराष्ट्र श्रावण बाळ योजना| Shravan Bal Yojana 2023 वैशिष्ट्ये व स्वरूप

महाराष्ट्र श्रावण बाळ योजना २०२३  ही योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक आणि विशेष सहाय्य विभागाकडून राबवली जाते या योजनेप्रमाणेच निराधार आणि दारिद्र रेषेखालील नागरिकांसाठी संजय निराधार योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना शासनाद्वारे राबवल्या जातात.

 • श्रावण बाळ या योजनेत दोन श्रेण्या करण्यात आल्या आहेत .

 1. श्रेणी( अ) या योजनेअंतर्गत ६५  व ६५  वर्षावरील दारिद्र रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्या निराधार स्त्री पुरुष नागरिकांना श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेमधून ४००  रुपये प्रतिमहा  निवृत्तीवेतन देण्यात येते आणि याच लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे २०० रुपये निवृत्ती वेतन म्हणून देण्यात येते.तसेच
 2. श्रेणी (ब) ही योजना जी नागरिक खरोखर गरजू निराधार वयोवृद्ध आहेत  परंतु त्यांची दारिद्र्यरेषेखालील यादीमध्ये नोंद नाही व अशा नागरिकांचे वय ६५ व ६५ च्या वरील आहे. आणि त्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21 हजार रुपयाच्या आत आहे अशा वृद्ध नागरिकांना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत सहाशे रुपये प्रति महिना प्रति लाभार्थी निवृत्ती वेतन म्हणून  देण्यात येते.
 • श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आवश्यक कागदपत्र | Shravan Bal Yojana require documents

 1. वयाचा दाखला: ग्रामपंचायत किंवा नगरपालिका/ महानगरपालिका मधून अधिकृत जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा, ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक यांचा किंवा त्यावरील दर्जाच्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला वयाचा दाखला.
 2. दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव: दारिद्र्यरेषेखालील यादीमध्ये त्या व्यक्ती किंवा कुटुंबाचा समावेश असल्याचा अधिकृत पुरावा.
 3. रहिवाशी दाखला: ग्रामीण भागातील ग्रामसेवक, तलाठी, मंडळ, निरीक्षक, नायब तहसीलदार किंवा तहसीलदार यांचा दिलेला रहिवासी असल्याबाबतचा दाखला.
 • श्रावण बाळ योजना २०२३ | Shravan Bal Yojana 2023 साठी अर्ज कुठे व कसा करायचा :

महाराष्ट्र श्रावण बाळ योजना २०२३ | Shravan Bal Yojana 2023 या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र लाभार्थी उमेदवारांनी सर्वप्रथम आपल्या स्थानिक ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांच्याशी भेट देऊन प्रथम आपण या योजनेसाठी पात्र असल्याची माहिती घ्यावी, नंतर तेथेच आपण अर्जाची मागणी करून अर्ज लिहून देऊ शकता व त्यासाठी लागणारे कागदपत्राची पूर्तता करून अर्जासोबत जोडणी करून देऊ शकता. तसेच आपण महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सुद्धा ऑनलाईन पद्धतीने श्रावण बाळ योजना २०२३ साठी ऑनलाईन नोंदणी करू शकता.

Read more

पाच लाख रु विमा संरक्षण मोफत प्रत्येक नागरिकाला | Ayushman Bharat Yojana Maharashtra 2023

 

            आयुष्यमान भारत योजना |Ayushman Bharat Yojana

मित्रानो, आपण आयुष्मान भारत योजना | Ayushman Bharat Yojana  किंवा प्रधान मंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना या एक केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे, जी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरू केली गेली. आयुष्मान भारत योजनेत केंद्र सरकार गरीब कुटूंब व शहरातील गरीब लोकांच्या कुटूंबांना आरोग्य विमा उपलब्ध करते. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत आयुष्यमान भारत योजना देशभरात चालवली जात आहे. भारत सरकारच्या या योजनेंतर्गत देशातील १० कोटीहून अधिक कुटुंबांना लाभ मिळेल. यासाठी तुम्हाला आयुष्मान भारतचे कार्ड बनवावे लागेल, त्यासाठी काही आवश्यक पात्रता निर्धारित करण्यात आलीय. पात्र लोक हे कार्ड बनवू शकतात आणि हॉस्पिटलमध्ये ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळवू शकतात.

 आयुष्यमान भारत योजना |Ayushman Bharat Yojana  

जन आरोग्य योजना हि राज्यातील सर्व शिक्षा पत्रिका/ रेशन कार्ड, धारक आदिवासी प्रमाणपत्र धारक या सर्व नागरिकांना लागु करणेचा निर्णय घेण्यात आला आहे .त्यासाठी राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य कवच प्राप्त होवून या योजने अंतर्गत आरोग्य संरक्षण प्रती कुठुंब अडीच लाख रुपये वरून पाच लाख रुपये एवढे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात झाला आहे .

सरकारच्या आयुष्मान भारत योजनेत (Ayushman Bharat Yojana) समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास लोकांना आरोग्य विम्याची सुविधा मिळते. एबीवाय योजनेला प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाही संबोधले जाते. Ayushman Bharat Yojana या योजनेच्या माध्यमातून देशातील 10 कोटी कुटूंबांना प्रतिवर्ष 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मिळत आहे. आर्थिक व सामाजिक दृष्टी अंतर्गत ग्रामीण भागातील ८.०३ कोटी कुटूंब आणि शहरी भागातील २.३३ कोटी कुटूंबे आयुष्मान भारत योजनेच्या कक्षेत येतील. सध्या आयुष्मान भारत योजनेत ६२,६६७ कूटूंब पात्र आहेत.

Ayushman Bharat Yojana  
Ayushman Bharat Yojana

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजनाचा एकत्रित लाभ घेता येणार आहे. तसेच दोन्ही योजनाची अंगीकृत आरोग्य केंद्रावर उपचार घेता येणार आहे . महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये एकूण ९९६ तर  प्रधानमंत्री जन आरोग्य योजने मध्ये १२०९ उपचार आहेत आता मिळून दोन्ही योजनाची उपचार संख्या १३५६ करणेत आली आहे. Ayushman Bharat Yojana या योजनासाठी एकूण आरोग्यसेवा रुग्णालयाची संख्या १ हजार एवढी करण्यात आली आहे .

आयुष्मान भारत योजनेची वैशिष्टे| Ayushman Bharat Yojana’s features

 1. राष्ट्रीय आरोग्य संरक्षण अभियानात प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लाख अशी आरोग्य संदर्भात संरक्षण लाभ कवच असेल.
 2. या योजनेचे फायदे देशभरात सर्वत्र आहेत आणि योजनेअंतर्गत समाविष्ट लाभार्थ्याला देशभरातील कोणत्याही सार्वजनिक/खाजगी रुग्णालयांमधून कॅशलेस लाभ घेण्याची परवानगी दिली जाईल.
 3. Ayushman Bharat Yojana – राष्ट्रीय आरोग्य संरक्षण मिशन ही सामाजिक व आर्थिक जात जनगणना डेटाबेसमधील वंचिततेच्या निकषांच्या आधारे पात्रता ठरविलेली पात्रता आधारित योजना असेल.
 4. लाभार्थी सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही वैदकीय सुविधांमध्ये लाभ घेऊ शकतात.
 5. खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी, उपचारांसाठीची किमत सरकार ने दिलेल्या पॅकेज परीपत्रकाच्या आधारावर केली जातील.
 6. आयुष्मान भारत – राष्ट्रीय आरोग्य संरक्षण अभियानाच्या मुख्य तत्त्वांपैकी एक म्हणजे सहकारी संघराज्य आणि राज्यांसाठी लवचिकता निर्माण करणे होय.
 7. धोरणात्मक निर्देश देण्यासाठी आणि केंद्र आणि राज्यांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सर्वोच्च स्तरावर आयुष्मान भारत राष्ट्रीय आरोग्य संरक्षण मिशन परिषद स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे.
 8. Ayushman Bharat Yojana लागू करण्यासाठी राज्यांना स्टेट हेल्थ एजन्सी असणे आवश्यक आहे.
 9. योजनेचा निधी वेळेवर पोहोचेल याची खात्री करण्यासाठी, केंद्र सरकारकडून आयुष्मान भारत – राष्ट्रीय आरोग्य संरक्षण अभियानाद्वारे राज्य आरोग्य संस्थांना निधी हस्तांतरित करणे थेट एस्क्रो खात्याद्वारे केले जाऊ शकते.
 10. नीती आयोगाच्या भागीदारीत, एक मजबूत, मॉड्युलर, स्केलेबल आणि इंटरऑपरेबल आयटी प्लॅटफॉर्म कार्यान्वित केले जाईल ज्यामध्ये पेपरलेस, कॅशलेस व्यवहार होईल.

कार्ड वाटप लवकर चालू होईल

महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनेचे पूर्वीचे कार्ड या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत विलीन केले जाणार आहे तसेच नवीन कार्ड ची नोंदणी लवकरच सुरु होईल. अशा प्रकारे केंद्र व राज्य सरकार दोन्ही मिळून एकत्रित हि योजना राबवत आहे .ज्यांचे कार्ड बनवले नाही अशा सर्वांसाठी कार्ड नोंदणी चालू आहे आपण सरकारच्या वेब संकेत स्थळावर जावून नोंद करू शकता.

निष्कर्ष :

प्रधान मंत्री Ayushman Bharat Yojana हि प्रत्येक नागरिकाच्या हिताची भारत सरकारची आरोग्यदायी योजना आहे . सर्व नागरिकांना वैद्यकीय क्षेत्रात पैशाअभावी उपचार घेता यावा यासाठी सरकार नि हि हितकारी योजना संयुक्तपणे राबवली आहे . प्रत्येक कुठुंब व कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती यांच्यासाठी प्रती ५ लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे .माहिती आवडली असेल तर इतरांना पाठवा, धन्यवाद.

Read more