Pradhan Mantri Fasal Bima Yojana 2023 | प्रधान मंत्री फसल बीमा योजना २०२३

 

Pradhan Mantri Fasal Bima Yojana | प्रधान मंत्री फसल बीमा योजना २०२३ 

भारत हा कृषिप्रधान देश आहे. बहुतांश लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. ग्रामीण भागातील लोकसंख्या ही सुद्धा शहरी भागापेक्षा जास्त आहे. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र भाई मोदी यांनी 13 जानेवारी 2016 रोजी Pradhan Mantri Fasal Bima Yojana | प्रधान मंत्री फसल बीमा योजना या नवीन योजनेची घोषणा केली या योजनेअंतर्गत त्यांच्या शेतासाठी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांवर प्रीमियम चा बोजा कमी व्हावा आणि त्यांचे शेताचे संरक्षण व्हावे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून या योजनेची सर्व देशभरात घोषणा करण्यात आली.


            Pradhan Mantri Fasal Bima Yojana | प्रधान मंत्री फसल बीमा योजना योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना येणाऱ्या बऱ्याचशा अडचणी कमी व्हाव्यात, त्यांना विमा दावे निकाल काढण्याची जलद प्रक्रिया आणि सुलभ निर्णय घेता यावेत यासाठी ही योजना भारतातील प्रत्येक राज्यामध्ये लागू करण्यात आली आहे. देशातील प्रत्येक शेतकरी नागरिकाला त्याच्या उत्पन्नाच्या संरक्षणासाठी भारत सरकारकडून मोठा मोबदला प्रीमियमच्या स्वरूपात दिला जाणार आहे. यासाठी भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे योजना प्रशासित केली जाईल.

Pradhan Mantri Fasal Bima Yojana
Pradhan Mantri Fasal Bima Yojana

Pradhan Mantri Fasal Bima Yojana | प्रधान मंत्री फसल बीमा योजनेची उद्दिष्टे

 1. कृषी क्षेत्रात नैसर्गिक आपत्ती, रोगराई, किट कोणत्याही प्रकारच्या समस्येपासून नुकसान झालेले पीक त्या शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहायता मिळवून देणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.
 2. शेतकऱ्यांना शेतातील शाश्वत प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी व शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर करण्यासाठी ही योजना काम करते.
 3. शेतकऱ्यांना शेतीमध्ये नवनवीन पद्धती, तांत्रिक, अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यास प्रोत्साहित केले जाते.
 4. Pradhan Mantri Fasal Bima Yojana | प्रधान मंत्री फसल बीमा योजना सर्वात महत्त्वाचे कृषी क्षेत्रासाठी लागणारा आर्थिक पतपुरवठा सुनिश्चित करणे.

Pradhan Mantri Fasal Bima Yojana | प्रधान मंत्री फसल बीमा योजनेचे प्रमुख मुद्दे

 1. Pradhan Mantri Fasal Bima Yojana | प्रधान मंत्री फसल बीमा योजना या योजनेअंतर्गत भारत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या संरक्षणासाठी भारत सरकारकडून अर्थसहाय्य केले जाईल हे अर्थसहाय्य पिक विमा कंपनीच्या प्रीमियम च्या स्वरूपात अनुदान म्हणून दिले जाईल. यामध्ये शेतकऱ्यांना भरावयाचे असणारे पीक विमा हप्ते प्रीमियम याचे दर कमी करून उर्वरित हप्ता हे शासकीय तिजोरीतून भरले जाणार आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांना कोणतेही प्रकारची नैसर्गिक आपत्तींना सामोरे जात असताना येणाऱ्या पिकाच्या नुकसानीसाठी संपूर्ण विमा रक्कम दिली जाईल.
 2. राज्यातील शेतकऱ्यांना सर्व खरीप पिकासाठी फक्त २% टक्के इतकाच प्रीमियम भरावयाचा आहे त्याचबरोबर सर्व रब्बी पिकांसाठी १.५% टक्के एकसमान प्रीमियम शेतकऱ्यांना भरावयाचा आहे वार्षिक व्यावसायिक बागायतदार फळ बागायतदार या सर्व शेतकऱ्यांसाठी हा प्रीमियम फक्त ५% टक्के इतका असेल.
 3. सरकारी अनुदानावर कोणतीही मर्यादा नाही, उर्वरित प्रीमियम सर्वच्या सर्व तो 90% असला तरीही सरकार भरपाई करणार यापूर्वी प्रीमियम दारावर मर्यादे ची  तरतूद होती त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दाव्याचे परतावे मिळत होते; परंतु आता ही अट काढून टाकण्यात आली आहे. आणि शेतकऱ्यांना कोणत्याही कपाती शिवाय संपूर्ण रकमेचा परतावा मिळेल.
 4. पंतप्रधान फसल बीमा योजना या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन दिले जाईल. जेणेकरून क्लेम पेमेंट मध्ये होणारा विलंब टाळता येईल त्यासाठी स्मार्टफोन, रिमोट सेन्सिंग, ड्रोन, जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करून डेटा गोळा करून अपलोड केला जाईल; यामुळे वेळेची बचत होऊन संबंधित शेतकऱ्यांना या योजनेचा त्वरित लाभ घेता येईल.
 5. प्रधानमंत्री फसल बीमा योजना या योजनेचा सर्व कार्यभार भारतीय कृषी विमा कंपनी या एकाच विमा कंपनीकडे हाताळणीसाठी देवू केला जाणार आहे.
 6. या योजनेसाठी 2016-17 च्या अर्थसंकल्पात सादर केलेल्या योजनांसाठी ५५५० कोटी रुपयाची तरतूद आहे.

Pradhan Mantri Fasal Bima Yojana | प्रधान मंत्री फसल बीमा योजना या योजनेअंतर्गत समाविष्ट घटक

शेतकऱ्यांचे संरक्षण :

या योजनेमध्ये अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके घेणारे भाडेकरू/भाडेकरू शेतकरी सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना संरक्षण प्राप्त आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी राज्यात प्रचलित जमीन अभिलेख जमीन ताब्यात प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. शिवाय राज्य सरकारने अधिसूचित केलेली परवानगी लागू करार, कराराचा तपशील इत्यादी सर्व कागदपत्रे आवश्यक आहे.

अनिवार्य घटक वित्तीय संस्थाकडून अधिसूचित पिकासाठी हंगामी कृषी ऑपरेशन साठी कर्ज घेणारे सर्व शेतकरी संरक्षण केले जाईल. बिगर कर्जदार शेतकरी हा या योजनेचा अचूक घटक आहे या योजनेअंतर्गत एस सी /एस टी/ महिला शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी विशेष प्रयत्न केला जाईल या योजनेअंतर्गत अर्थसंकल्पीय वाटप आणि वापर संबंधित राज्याच्या अनुसूचित जाती/जमाती /सामान्य श्रेणीच्या जमिनीच्या प्रमाणात असेल पिक विमा योजनेच्या अंमलबजावणीत आणि शेतकऱ्यांचा अभिप्राय मिळवण्यात पंचायत राज्य संस्था सहभागी होऊ शकतात.

पीक संरक्षण :

Pradhan Mantri Fasal Bima Yojana | प्रधान मंत्री फसल बीमा योजना या योजनेमध्ये अन्न पिके जसे की तृणधान्य, बाजरी, कडधान्य, तेलबिया आणि वार्षिक व्यावसायिक /वार्षिक फलो उत्पादन पिके यांचा समावेश करण्यात आला आहे या सर्व प्रकारच्या पिकांसाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेमध्ये संरक्षण देण्यात येईल.

जोखीम संरक्षण :

 • Pradhan Mantri Fasal Bima Yojana | प्रधान मंत्री फसल बीमा योजना जोखीम संरक्षण काही टप्प्यामध्ये आणि पिकाच्या नुकसानी जबाबदार असणारे धोके लक्षात घेता बनवले आहे.
 • प्रथम पेरणी व लागवड थांबवण्यासंबंधी जोखीम म्हणजेच कमी पाऊस किंवा विमा उतरवलेल्या क्षेत्रावरील प्रतिकूल हवामानामुळे पेरणी लागवड थांबवल्यामुळे जर नुकसान होत असेल तरी पीक विमा संरक्षण दिले जाईल.
 • उभी पिके पेरणी केल्यापासून कापणी पर्यंतच्या सर्व कालावधीमध्ये जर दुष्काळ दुष्काळग्रस्त परिस्थिती, पूर्जन्य स्थिती, कीटक रोगराई, भूखनान, नैसर्गिक आग, वीज, गारपीट, वादळ, चक्रीवादळ यासारख्या बऱ्याचशा अनैसर्गिक / नैसर्गिक गोष्टीमधून होणारे पिकाचे नुकसान व त्याची जोखीम विमा संरक्षण हे या योजनेमधून दिले जाईल होणारी उत्पन्नाची नुकसान भरपाई दिले जाईल
 • पीक कापणी नंतरची नुकसान म्हणजेच पिकाच्या पक्वतेनंतर पिकाची कापणी झाल्यानंतर जर का चक्रीवादळ पाऊस अवकाळी पाऊस गारपीट या प्रकारच्या काही कारणास्तव जर शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यास अशा विशिष्ट परिस्थितीमध्ये दोन आठवड्या पर्यंतच्या कालावधीसाठी विमा संरक्षण उपलब्ध आहे.
 • स्थानिकीय आपत्ती म्हणजे स्थानिकीय परिस्थिती ज्या भागांमध्ये शेतकऱ्याची शेती आहे त्या भागातील स्थानिकीय स्थिती मुसळधार पाऊस, भूखाणन, पूर यासारख्या स्थानिक धोक्यामुळे जर का शेतीचे नुकसान पिकाचे नुकसान होत असेल अशा वेळेस या योजनेअंतर्गत त्या सर्व शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिले जाणार आहे.

जोखीम वगळणे:

Pradhan Mantri Fasal Bima Yojana | प्रधान मंत्री फसल बीमा योजना या योजनेअंतर्गत काही कारणाने नुकसान भरपाई मिळणार नाही ती कारणे :

 • युद्ध आणि आत्म धोका
 • आण्विक धोका
 • दंगा
 • दूर भावना पूर्व केले गेलेले नुकसान
 • चोरी आणि शत्रुत्वाच्या भावनेने केलेले कृत्य
 • पाळीव किंवा वन्यप्राण्यांचे चरने व  इतर टाळता येण्याजोगे धोके

विम्याची रक्कम आणि संरक्षण मर्यादा:

Pradhan Mantri Fasal Bima Yojana | प्रधान मंत्री फसल बीमा योजना या योजनेअंतर्गत अनिवार्य घटकांतर्गत कर्जदार शेतकऱ्यांच्या बाबतीत विमा ची रक्कम ही विमाधारकाच्या जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने ठरवून दिलेल्या आर्थिक मोजमापाच्या बरोबरीची असेल जसे की विमा उतरवलेल्या पिकाच्या कमाल उत्पादनाच्या मूल्यांपर्यंत वाढवता येईल.

विमाधारक शेतकऱ्याचा पर्याय जर कमाल उत्पन्न मूल्य कर्जाच्या रकमेपेक्षा कमी असेल तर विम्याची रक्कम जास्त असेल. चालू वर्षाच्या किमान आधार किंमत याच्यासोबत राष्ट्रीय कमाल उत्पन्नाचा गुणाकार केल्यास विम्याची रक्कम मिळते. जेथे चालू वर्षाचा एमएसपी उपलब्ध नसेल तेथे मागील वर्षाचा एम एस पी स्वीकारला जाईल. ज्या पिकासाठी आधारभूत किंमत जाहीर केलेली नाही अशा पिकासाठी पणन विभाग स्थापित केलेल्या किमतीचा अवलंब केला जाईल.

अधिक माहिती समजून घेण्यासाठी YOUTUBE वर पहा.

Pradhan Mantri Fasal Bima Yojana | प्रधान मंत्री फसल बीमा योजनेचे व्यवस्थापन देखरेख आणि अंमलबजावणी :

 • विमा कंपनीच्या अंमलबजावणीवर संपूर्ण नियंत्रण हे भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या देखरेख खाली असेल. संपूर्ण राज्यासाठी एक विमा कंपनी असेल अंमलबजावणीसाठी एजन्सी तीन वर्षाच्या कालावधीसाठी निवडून दिली जाऊ शकते. तसेच राज्य सरकार केंद्रशासित प्रदेश आणि संबंधित विमा कंपनी संबंधित असल्यास अटीवर फेरनिविदा करण्यास मोकळे आहेत विमा कंपन्यांना सामाजिक आर्थिक विकासासाठी विविध कल्याणकारी उपक्रमांमध्ये प्रीमियम बचत गुंतवणूक शेतकऱ्यांमध्ये विश्वासारखा प्रस्थापित करण्यास मदत होईल.
 • नाव, वडिलांचे नाव, बँक खाते क्रमांक, गाव, वर्ग, लहान आणि सीमांत महिला विमाधारक, विमाधारक पीक यासारख्या आवश्यकता तपशीला सहन नोडल बँकेच्या मध्यस्थ मार्फत पुढील जुळणी करण्यासाठी विमाधारक शेतकऱ्यांची यादी कर्जदार असो किंवा बिगर कर्जदार संक्रालित प्रीमियम सरकारी अनुदान इत्यादी संबंधित शाखेतून सॉफ्ट कॉपी मध्ये मिळू शकतात. प्लॅटफॉर्म तयार झाल्यानंतर ते ऑनलाईन केले जाईल.
 • संबंधित विमा कंपन्याकडून डाव्याचे रक्कम मिळाल्यानंतर वित्तीय संस्था बँका हक्काचे रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात एक आठवड्याच्या आत हस्तांतरित करावी ही रक्कम विमा कंपनी द्वारे थेट शेतकऱ्याच्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने जमा केले जातील.
 • पिक विमा पोर्टल आणि संबंधित विमा कंपन्यांच्या वेबसाईटवर लाभार्थ्याची यादी अपलोड केली जाऊ शकते.
 • सुमारे पाच टक्के लाभार्थी विमा कंपनीच्या प्रादेशिक कार्यालय द्वारे सत्यापित केले जाऊ शकतात. जे संबंधित जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती आणि पिक विमा वरील राज्य सरकार समन्वय समिती यांना अभिप्राय पाठवतील.
 • विमा कंपनीने सत्यापित केलेल्या लाभार्थ्यापैकी किमान दहा टक्के संबंधित जिल्हास्तरीय स नियंत्रित समिती द्वारे क्रॉस व्हेरिफाय केले जातील. आणि त्यांना अभिप्राय राज्य सरकारला पाठवतील.
 • एक ते दोन टक्के लाभार्थी विमा कंपनीच्या मुख्य कार्यालयाद्वारे केंद्र सरकार राष्ट्रीय स्तरावरील देखील समितीने नियुक्ती केलेल्या स्वतंत्र संस्थाद्वारे सत्यापित केले जाऊ शकतात. आणि ते केंद्र सरकारला आवश्यक अहवाल पाठवतील.

Pradhan Mantri Fasal Bima Yojana | प्रधान मंत्री फसल बीमा योजनाया योजनेसाठी भरावयाचे फॉर्म पद्धती :

 • Pradhan Mantri Fasal Bima Yojana | प्रधान मंत्री फसल बीमा योजना या भारत सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन लॉगिन करा https://pmfby.gov.in/
 • नंतर शेतकऱ्यांनी भरावयाचा अर्ज किंवा फार्मर एप्लीकेशन अशी एक विंडो दिसते तेथे जाऊन आपण सविस्तर माहिती भरणे आहे https://pmfby.gov.in/farmerRegistrationForm
 • त्याचबरोबर त्या पोर्टल वरती विमा भरण्यासाठी लागणारे रक्कम याचे कॅल्क्युलेटर पण दिली आहे
 • ज्या शेतकऱ्यांनी अगोदर फॉर्म भरलेले आहेत अशा शेतकऱ्यांना आपल्या पॉलिसीची स्थिती पाहण्यासाठी एप्लीकेशन स्टेटस म्हणून एक विंडो आहे तेथे जाऊन आपण आपल्या पॉलिसीची स्थिती पाहू शकता.

या योजनेसाठी भरावयाचे आवश्यक कागदपत्रे :

 • आधार कार्ड
 • शिक्षा पत्रिका
 • बँक खाते पासबुक
 • पत्ता पुरावा जसे की ड्रायव्हिंग लायसन पासपोर्ट मतदार ओळखपत्र
 • जर तुमच्याकडे भाड्याची जमीन असेल तर त्या शेतमालकाशी केलेला करार कॉपी
 • शेती खाते क्रमांक
 • शेतकऱ्याचा फोटो
 • शेतकऱ्यांनी पीक सुरू केल्याची तारीख

निष्कर्ष :

Pradhan Mantri Fasal Bima Yojana | प्रधान मंत्री फसल बीमा योजना हि योजना शेतकर्यांना येणाऱ्या अनिश्चित अडचणींना सामोरे जात असताना महत्वाचे योगदान देत आहे. पिकाचे होणारे नुकसान व त्यासाठी आवशक विमा याची गरज लक्षात घेता सरकार कडून योग्य उपाययोजना केली आहे. मित्रानो लेखामध्ये काही अडचण असेल या काही समजल नसेल तर मैल करा. अन माहिती आवडली असेल तर कमेंट करा, धन्यवाद.

हे पण वाचा

शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना 2023

Leave a Comment