डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2023 | Swadhar Yojana 2023

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2023 | Swadhar Yojana 2023

       भारत देश हा विकासशील देश आहे. औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वर होत आहे त्यामुळे औद्योगिक क्षेत्र बरोबर शिक्षण क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यात सुद्धा कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी व्यावसायिक बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या वाढत आहे. तसेच या विद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. या विद्यार्थ्यांमध्ये अनुसूचित जाती जमाती आर्थिक दृष्ट्या मागास दुर्बल घटकांचे प्रमाण जास्त आहे.

अशा महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी बहुतांश वेळा या विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगृहात प्रवेश मिळत नाही. आणि या विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण घेण्यासाठी जास्त खर्च करून बाहेर राहून व्यवसाय किंवा इतर व्यवसाय शिक्षण पूर्ण करता येत नाही. त्यांना शासकीय वस्तीगृहात प्रवेश करून देण्यासाठी व त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आपल्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमाती आर्थिक दृष्ट्या मागास नव बौद्ध विद्यार्थ्यांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2023 | Swadhar Yojana 2023 सुरू केली आहे जेणेकरून या विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण सोईस्करपणे पूर्ण करता येईल.

 डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2023 | Swadhar Yojana 2023 उद्देश 

Swadhar Yojana
स्वाधार योजना 2023 | Swadhar Yojana 2023

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2023 | Swadhar Yojana 2023 ही एक महाराष्ट्र शासनाचे महत्त्वकांक्षी योजना पाहणार आहोत. महाराष्ट्र शासनाने 2016-17 मध्ये एक शैक्षणिक योजना राबवली. ती म्हणजे स्वाधार योजना आहे. आर्थिक दृष्ट्या मागास तसेच अनुसूचित आणि नऊ बौद्ध विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी येणाऱ्या अडचणी त्यापासून सुटका करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी सहाय्यता मिळावी म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अंतर्गत अशा विद्यार्थ्यांच्या अडचणीवर उपाय म्हणून त्यांच्या शिक्षणासाठी अनुदान रुपात आर्थिक मदत केली जाते.

भारत देश हा विकसित देश म्हणून ओळखला जातो पण आज पण या देशांमध्ये खूप मागासवर्गीय लोक त्याचबरोबर आर्थिक दृष्ट्या दुर्बल असे अनेक कुटुंब आहेत त्याच कुटुंबातील मुलांना मुलींना पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. पैशाच्या अभावामुळे अशा मुलांचे शिक्षण मध्येच खंडित होते. शिक्षणासाठी लागणारा खर्च या कुटुंबाला करता येत नसल्यामुळे मुलांची शिक्षण हे अर्धवट सोडून द्यावे लागते. आणि यातून असुशिक्षित मुलांचे प्रमाण या समाजात मोठ्या प्रमाणावर वाढत जाते, त्यातून ही मुले पुढे त्यांच्या भविष्यासाठी काही उपाययोजना करू शकत नाहीत. त्यांचे जीवन शिक्षण अभावी अंधारात जाऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकार त्यांच्यासाठी अशा योजना कार्यरत करत असते.

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2023 | Swadhar Yojana 2023 वैशिष्ट्ये

महाराष्ट्र शासनाने इयत्ता अकरावी – बारावी शिकणारे तसेच अकरावी आणि बारावी नंतर व्यावसायिक किंवा व्यवसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती-जमाती, आर्थिक दृष्ट्या दुर्बल, विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात सहाय्यता करण्यासाठी महाराष्ट्र स्वाधार योजना अंतर्गत अनुदानाच्या रूपात आर्थिक मदत करते.

महाराष्ट्र स्वाधार योजना 2023 | Swadhar Yojana 2023 अंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तीग्रह प्रवेश मिळवून देणे. त्यांच्या उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या अडचणी भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधा या सर्व विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून देतात. यासाठी लागणारे आवश्यक अनुदान रक्कम संबंधित अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये हस्तांतरण द्वारे वितरित करण्यासाठी शासनाने डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार | Swadhar Yojana 2023 योजना सुरू केली आहे ही योजना शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येते.

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना | Swadhar Yojana 2023 अंतर्गत मिळणारे लाभ

महाराष्ट्र स्वाधार योजना 2023 | Swadhar Yojana 2023 अंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकार अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना अकरावी- बारावी आणि त्यानंतर पदवी तर शिक्षण अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि त्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही. अशा विद्यार्थ्यांना भोजन भत्ता निवासाची सोय आणि इतर शैक्षणिक सुविधा साठी वार्षिक खर्चासाठी खालील प्रमाणे अनुदानित रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येते.

मिळणारा भत्ता मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या सारख्या क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदानाची रक्कम इतर महसूल विभागीय शहरातील व उर्वरित ”क” वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदानाची रक्कम उर्वरित क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदानाची रक्कम
भोजन भत्ता 32,000/- रुपये 28,000/- रुपये 25,000/- रुपये
निवास भत्ता 20,000/- रुपये 15,000/- रुपये 12,000/- रुपये
निर्वाह भत्ता 8,000/- रुपये 8,000/- रुपये 6,000/- रुपये
असा एकूण भत्ता 60,000/- रुपये 51,000/- रुपये 43,000/- रुपये

वरील अनुदान व्यतिरिक्त वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी संबंधित विद्यार्थ्याला प्रतिवर्षी पाच हजार रुपये अशी धनराशी आणि अन्य अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी दोन हजार रुपये इतकी धनराशी शैक्षणिक साहित्य साठी ठोक स्वरूपात देण्यात येते

स्वाधार योजना 2023 | Swadhar Yojana 2023 लाभार्थी पात्रता

महाराष्ट्र राज्यातील ज्या अनुसूचित जाती व नव बौद्ध विद्यार्थ्यांना स्वाधार योजना अंतर्गत लाभ मिळवायचा आहे त्यांना या योजनेचा अर्ज भरणे आवश्यक आहे या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी लाभार्थी पात्रता खालील प्रमाणे;

 1. लाभार्थी हा अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गाचा असणे आवश्यक आहे.
 2. लाभार्थी विद्यार्थ्यांचे जातीचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
 3. लाभार्थी विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
 4. लाभार्थी विद्यार्थी याच्याकडे राष्ट्रीय बँक खाते असणे बंधनकारक असून त्या खात्याला स्वतःचा आधार नंबर संलग्न असणे आवश्यक आहे.
 5. लाभार्थी विद्यार्थी व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
 6. लाभार्थी विद्यार्थी हा स्थानिक नसावा म्हणजे प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणावर चा रहिवाशी यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 7. स्वाधार योजनेमध्ये विद्यार्थी अकरावी किंवा बारावी नंतर दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसलेल्या अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण घेणार असावा.
 8. स्वाधार योजनेमध्ये अकराव्याने बारावी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी मध्ये किमान 60 टक्के पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
 9. जर लाभार्थी विद्यार्थी दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसणाऱ्या कोणत्याही मान्यता प्राप्त अभ्यासक्रमात प्रवेश घेणार असेल तर त्याला प्रत्येक वर्षी किमान 60 टक्के गुण किंवा त्याच्या ग्रेड प्रमाणे गुण असणे आवश्यक आहे.
 10. Swadhar Yojana 2023या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी राज्य शासन अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद भारतीय वैद्यकीय शिक्षण परिषद वैद्यकीय परिषद भारतीय फार्मसी परिषद वास्तू कला परिषद कृषी परिषद महाराष्ट्र तंत्र शिक्षण परिषद किंवा पश्चिम शिक्षण प्राधिकारी यांच्यामार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालयांमध्ये केव्हा मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा.

महाराष्ट्र स्वाधार योजना 2023 | Swadhar Yojana 2023 उद्दिष्टे

राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि कमी उत्पन्न गटातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील गुणवंत होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही त्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणी येत असतात अशा होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत करणे त्यांचे उज्वल भविष्य निर्माण करणे अशा विद्यार्थ्यांना भोजनासाठी सोय करणे त्यांना निवासाची व इतर शैक्षणिक सुविधा मिळवून देणे हे स्वाधार योजना 2023 | Swadhar Yojana 2023 या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य आहे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय विशेष विभागामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या माध्यमातून अनुदानाच्या स्वरूपात या विद्यार्थ्यांना आर्थिक सहायता देणे

महाराष्ट्र स्वाधार योजना 2023 | Swadhar Yojana 2023 आवश्यक कागदपत्रे

 1. महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र
 2. आधार कार्ड
 3. जातीचे प्रमाणपत्र
 4. बँक खाते पुरावा म्हणून बँकेचे पासबुकची झेरॉक्स
 5. तहसीलदारांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला
 6. विद्यार्थी दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र
 7. इयत्ता दहावी बारावी किंवा पदवी परीक्षेचे गुणपत्रिका
 8. महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट
 9. लाभार्थी विद्यार्थिनी विवाहित असल्यास पतीच्या उत्पन्नाचा दाखला
 10. बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न केल्याचा पुरावा
 11. लाभार्थी कोणत्याही शासकीय वस्तीगृहात प्रवेश घेतला नसल्याचे शपथपत्र
 12. स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
 13. महाविद्यालयाचे उपस्थिती प्रमाणपत्र
 14. वर्तमान रहिवासी पुरावा
 15. महाविद्यालयातील सत्र परीक्षेच्या निकालाच्या प्रती

महाराष्ट्र स्वाधार योजना 2023 | Swadhar Yojana 2023 अर्ज करण्याची प्रक्रिया

स्वाधार योजना 2023 | Swadhar Yojana 2023 योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे त्यांनी खालील प्रमाणे अर्ज करावा.

 • अर्जदार विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्याच्या समाज समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
 • वेबसाईटच्या होम पेज वरून सर्वप्रथम स्व धार योजना पीडीएफ हा पर्याय दिसेल तेथून स्वधार योजनेचा पीडीएफ स्वरूपातील अर्ज डाऊनलोड करून घ्यावा लागेल.
 • अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती व्यवस्थित व सुयोग्य पद्धतीने भरून त्यासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे हे सर्व दस्तऐवज संबंधित समाज कल्याण कार्यालयात जाऊन जमा करणे.
 • याप्रमाणे या योजनेचे अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
 • आधार योजना माहिती पीडीएफ, शासकीय निर्णय व अर्ज पहा
 • स्वाधार योजना 2023 | Swadhar Yojana 2023 swadhar-yojana-mahiti

निष्कर्ष:

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना | Swadhar Yojana 2023 महाराष्ट्र शासनाची एक शैक्षणिक योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कमकुवत, कमी उत्पन्न असणाऱ्या गटातील अनुसूचित जाती, नव बौद्ध कुटुंबातील विद्यार्थी यांना आर्थिक सहाय्यता स्वरूपात अनुदान दिले जाते. या योजनेची जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. मी आशा करतो असं दिलेले माहिती योग्य प्रकारे आपणास समजले असेल योजना संदर्भात काही अडचण असेल तर आपण महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन माहिती घेऊ शकतो, धन्यवाद.

हे पण वाचा :

majhi kanya bhagyashri yojana

Leave a Comment