रमाई घरकुल आवास योजना 2023

रमाई घरकुल आवास योजना 2023

        नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन योजना आपल्या सर्वांचे माहितीसाठी घेऊन आलो आहोत. महाराष्ट्र सरकारच्या मार्फत राज्यातील आर्थिक दुर्बल आणि गरीब सर्वसामान्य नागरिकांसाठी कल्याणकारी योजना तिचे नाव रमाई घरकुल आवास योजना ही एक अत्यंत महत्त्वाची आणि महत्वकांक्षी राज्य पुरस्कृत योजना आहे. ज्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न कमी आहे. त्यांना जीवनावश्यक वस्तूसाठीच कसरत करावी लागते. त्यांची निवार्याची व्यवस्था नाही अशा सर्व आर्थिक दुर्बल असणाऱ्या नागरिकांना स्वतःच्या जागेवरती राज्य सरकार पक्क्या स्वरूपाची घरबांधणीची व्यवस्था करून या योजनेमार्फत देणार आहे.

चला आपण पाहूयात, रमाई घरकुल आवास योजनेत राज्य सरकार आपल्या नागरिकांना कशा पद्धतीने अर्थसहाय्य करते त्यांच्या घरापासून त्यांची पक्की घरे बनवण्यासाठी. राज्यामध्ये दारिद्र रेषेखालील ग्रामीण भागातील कुटुंबे व शहरी भागातील कुटुंब मोठ्या प्रमाणावर आढळतात. ज्यांच्याकडे राहायला स्वतःच्या मालकीचे घर नसते. अशा नागरिकांना नाईलाजास्तव रस्त्याच्या कडेला किंवा जिथे जागा सापडेल त्या ठिकाणी वस्ती करून राहावे लागते. या परिस्थितीत त्यांना पावसाच्या पाण्याचे तसेच आगीचे सुद्धा भय असते, या बाबीचा विचार करता महाराष्ट्र शासनाने या वंचित बेघर लोकांसाठी रमाई घरकुल आवास योजना सुरू केली आहे.

रमाई घरकुल आवास योजना

वाचक मित्रांनो, या लेखांमध्ये आपण रमाई घरकुल आवास योजना 2023 या योजनेबद्दल संपूर्ण माहिती जशी की, त्याचे योजनेचे फायदे, योजनेला लागणारी पात्रता, या योजनेचे उद्दिष्ट, रमाई आवास घरकुल योजनेला लागणारी कागदपत्रे, तसेच या योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज कसा करायचा, रमाई घरकुल योजनेत घर बांधण्यासाठी अनुदान किती मिळते, या संपूर्ण प्रकारची माहिती आपण पाहणार आहोत.

रमाई घरकुल आवास योजनेची वैशिष्ट्ये

आपले सरकार आपल्या महाराष्ट्र राज्यातील मागास अनुसूचित जाती वर्गातील नागरिकांच्या राहणीमान उंचावण्यासाठी आणि जीवनमान सुधारण्यासाठी त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एक महत्वाची योजना राबवत आहे ही योजना ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागासाठी लागू आहे. ज्यांच्याकडे स्वतःची जागा आहे पण राहण्यासाठी पक्की घरे नाहीयेत, अशा अनुसूचित जाती आणि नवबौद्ध  घटकासाठी घरकुल योजना दिनांक 15.11.2008 च्या निर्णयानुसार सुरू केली आहे. या योजनेमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

राज्यात राबविण्यात येणाऱ्या इंदिरा आवास योजना या केंद्र पुरस्कृत योजनेसह सामाजिक न्याय विभागाची रमाई आवास योजना तसेच आदिवासी विभागाची शबरी आदिवासी घरकुल योजना आणि गृह विभागाची राजीव गांधी निवारा योजना या राज्य पुरस्कृत ग्रामीण योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि सनियंत्रण होण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णय यावे इंदिरा आवास योजनेची व्याप्ती वाढवून राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कक्षात रूपांतरित करण्याची मान्यता दिली आहे.

केंद्र सरकारच्या दिनांक 14 एप्रिल 2016 च्या मार्गदर्शक सूचनानुसार इंदिरा आवास योजनेच्या नावात बदल करून प्रधानमंत्री आवास योजना लागू करण्यात आली आहे या योजनेमध्ये लाभार्थी निवड सामाजिक आर्थिक आणि जात सर्वेक्षण 2011 प्राधान्यक्रम यादी मधून करण्याबाबतच्या सूचना देण्यात आले आहेत या योजनेमध्ये सन 2019 पर्यंत किंवा 2022 पर्यंत नागरिक भागातील प्रत्येक पात्र नागरिकाला पक्के घर देण्याचे लक्ष शासन निर्धारित केले आहे.

रमाई घरकुल आवास योजना या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान

राज्य सरकार राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत नगरपरिषद महानगरपालिका विभागातील अनुसूचित जाती आणि नव बौद्ध परिवारांना पक्की गरीब देणे. तसेच त्यांच्या कच्च्या घराचे आणि झोपडीचे पक्के घरी बांधण्यासाठी शासनाकडून मर्यादित अनुदान उपलब्ध करून देते. इंदिरा आवास योजना ही ग्रामविकास विभागाकडून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शन तत्त्वानुसार ग्रामीण भागात राबविण्यात येणारे योजनांमध्ये अनुसूचित जाती संवर्गासाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे. या आरक्षणाच्या अंतर्गत मिळालेल्या लाभार्थ्यांना वगळून उर्वरित अनुसूचित जातीच्या अर्जामधून पात्र लाभार्थ्यांची निवड करून रमाई घरकुल आवास योजना अंतर्गत लाभ देण्यात येतील हे लाभ कशाप्रकारे असतील त्याची वर्गवारी करण्यात आली आहे.

सामान्य विभाग घरकुल बांधकाम 1,32,000/- रुपये
नक्षलग्रस्त आणि डोंगराळ भागासाठी घरकुल बांधकाम 1,42,000/- रुपये
शहरी विभागासाठी घरकुल बांधकाम 2.5 लाख रुपये
शौचालय बांधण्यासाठी 12,000/- रुपये

 

  • रमाई घरकुल आवास योजना या योजनेअंतर्गत लाभार्थ्याच्या अनुदानात 30 सप्टेंबर 2016 च्या शासन निर्णयानुसार सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार योजनेमध्ये घरकुल लाच्या बांधकामासाठी शौचालयासह सामान्य विभागासाठी लाख 32 हजार रुपये अनुदान तर नक्षलग्रस्त आणि डोंगराळ भागातील शौचालयासहित एक लाख 42 हजार रुपये अनुदान देण्याचे निर्धारित करण्यात आले.
  • रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत शहरी भागासाठी जसे नगरपालिका महानगरपालिका नगरपरिषद प्रधानमंत्री आवास योजनेप्रमाणे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न मर्यादा तीन लाख असलेल्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी अनुदानाचे रक्कम अडीच लाख रुपये निर्धारित करण्यात आले आहे.
  • रमाई घरकुल आवास योजना अंतर्गत लाभार्थ्यांना शौचालय बांधण्यासाठी देण्यात येणाऱ्या 12000 रुपयाची प्रतिकृती पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागामार्फत केली जाते. ही योजना अनुसूचित जाती आणि नव बौद्ध संवर्गातील नागरिकांसाठी राबविण्यात आले आहे.
  • रमाई घरकुल आवास योजना अंतर्गत घरकुल बांधण्यासाठी अनुदानाच्या व्यतिरिक्त नरेगा योजनेच्या अंतर्गत 90 दिवसाचा रोजगार उपलब्ध करून दिला जातो. यासाठी लाभार्थ्याला अठरा हजार रुपये मजुरीच्या स्वरूपात दिले जाते.
  • अनुसूचित जाती नवबौद्ध या संवर्गातील अपंग नागरिक यांचे अपंगत्व 40 टक्के पेक्षा जास्त आहे आणि त्यांचे उत्पन्न एक लाखाच्या आत आहे असे अपंग नागरिक रमाई घरकुल आवास योजनेच्या इतर अटी पूर्ण करत असतील तर अशा नागरिकांना रमाई आवास योजनेचा लाभ मिळू शकतो.

रमाई घरकुल आवास योजना 2023 उद्दिष्टे

महाराष्ट्र सरकार आपल्या नागरिकांच्या विशेष करून मागासवर्ग असणाऱ्या अनुसूचित जाती, जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारे सर्व घटक यांच्यासाठी नवनवीन योजना ची निर्मिती व अंमलबजावणी करत असते; त्याचप्रमाणे त्यांची राहणीमानी सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करत असते. ज्या लोकांकडे पक्की घरे किंवा राहण्यासाठी निवारा नाही ते आपल्यासाठी निवाऱ्याची व्यवस्था करू शकत नाही; अशा सर्व अनुसूचित जाती आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या नागरिकांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून घरकुल बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते;रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत त्यांना पक्की घरी दिली जातील.

रमाई घरकुल आवास योजना

महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाप्रमाणे रमाई घरकुल आवास योजना अंतर्गत राज्याच्या शहरी भागात 22 हजार 667 घरकुल आणि ग्रामीण भागात एक लाख 13 हजार 571 घरकुल बांधण्यास मान्यता दिली आहे; याबाबतचा अध्यादेश सामाजिक न्याय विभागाने जाहीर केला आहे. या योजनेला मान्यता 2021 ते 2022 या आर्थिक वर्षासाठी देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नव बौद्ध या संवर्गातील नागरिक जे या योजनेसाठी पात्र आहेत त्या सर्व नागरिकांना रमाई घरकुल आवास योजनेचा लाभ घेता येईल.

रमाई घरकुल आवास योजनेची पात्रता

रमाई घरकुल आवास योजना महाराष्ट्र शासनाची अतिशय महत्त्वाची योजना आहे. परंतु या योजनेसाठी लाभार्थी किंवा संबंधित प्रवर्गातील नागरिक यांच्यासाठी काही पात्रता निर्धारित करण्यात आले आहेत; त्या पात्रताची पूर्ती होत असेल तर त्या सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आणि आपल्या निवाऱ्याची व्यवस्था सरकारच्या माध्यमातून करता येणार आहे त्यासाठी काही निकष लावलेले आहेत.

  1. पात्र लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नव बौद्ध संवर्गातील असावा
  2. लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा किमान पंधरा वर्षापासून रहिवासी असावा.
  3. त्याच्याकडे पक्के घर नसावे.
  4. रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत लाभार्थी अर्जदाराच्या कुटुंबाची एकूण वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी एक लाख वीस हजार रुपये असेल आणि नगरपरिषद विभागासाठी एक लाख 50 हजार रुपये आणि महानगरपालिका क्षेत्रासाठी दोन लाख रुपये तसेच मुंबई महानगर क्षेत्रासाठी दोन लाख रुपये निर्धारित करण्यात आले आहे.
  5. लाभार्थी हा सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण 2011 च्या प्राधान्यक्रम यादीच्या निकषा बाहेरील असावा, कारण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागातील लाभार्थी निवडीसाठी सामाजिक आणि आर्थिक जात सर्वेक्षण प्राधान्यक्रम यादीतून वगळण्यात येणार आहेत.
  6. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार राज्य शासन महानगरपालिका नगरपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था शासनाचे उपक्रम यांच्या जमिनीवर अतिक्रमण करून राहत असलेले व दिनांक एक एक 1995 रोजी त्यांचे घरकुल त्यात जमिनीवर असल्यास आणि त्यांना संरक्षित झोपडीदार म्हणून संरक्षण प्राप्त असल्यास अशा लाभार्थ्यांना देखील या योजनेमध्ये समाविष्ट केले जाईल.
  7. रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्याने शासनाच्या अन्य ग्रह निर्माण योजना जसे की माढा मार्फत वितरित घर एस आर एस अंतर्गत बांधलेले घरकुले या प्रकारच्या अन्न योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

रमाई घरकुल योजना मंजुरीची जिल्ह्याप्रमाणे यादी

महाराष्ट्र राज्य सरकारचा मुख्य उद्देश हा राज्यातील गरीब नागरिकांना ज्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत, जे स्वतः स्वतःसाठी घरकुल बांधू शकत नाही, अशा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील गरीब कुटुंबांना पक्के घरकुल उपलब्ध करून देणे; हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी घरकुलाची संख्या विभागून देण्यात आली आहे महाराष्ट्र रमाई घरकुल आवास योजना 2023 च्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातला प्रगतीच्या दिशेने हा सर्वोत्पर उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र सरकार काम करत आहे; चला तर पाहूया या घरकुलाची आकडेवारी खालील प्रमाणे:

जिल्हा ग्रामीण भाग शहरी भाग
नागपूर 11677 2987
औरंगाबाद 30116 7565
लातूर 24274 2770
अमरावती 21978 3210
नाशिक 14864 346
पुणे 8720 5792
मुंबई 1942 86

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2023

माझी कन्या भाग्यश्री योजना २०२३

रमाई घरकुल आवास योजना या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

रमाई घरकुल आवास योजना अंतर्गत सादर करावे लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत.

  1. मतदार यादीतील नावाचा उतारा
  2. घरपट्टी पाणीपट्टी विद्युत बुल यापैकी एक कागदपत्र
  3. अधिकृत जातीचे प्रमाणपत्र जे सक्षम अधिकार्‍याने दिलेले असावे
  4. लाभार्थ्याचा उत्पन्नाचा दाखला
  5. लाभार्थ्याचे मतदान ओळखपत्र
  6. लाभार्थ्याचे रेशन कार्ड
  7. लाभार्थ्याचे सरपंच किंवा तलाठ्याचा दाखला
  8. शरीरातील महानगरपालिका नगरपालिका मधील मालमत्ता कर भरल्याच्या पावत्याची प्रत
  9. सातबाराचा उतारा मालमत्ता नोंद पत्र ग्रामपंचायतच्या मलमत्ता नोंद वहीत असलेला उतारा यापैकी काही ही

रमाई घरकुल आवास योजना या योजनेअंतर्गत घरकुल बांधकामाचे क्षेत्रफळ

रमाई घरकुल आवास योजना अंतर्गत घरकुल बांधावयासाठी महाराष्ट्र सरकारने 279 चौरस फूट इतके क्षेत्रफळ लक्षात धरून त्यासाठी लागणारे बांधकाम खर्च अनुदान स्वरूपात देणार आहे,जर लाभार्थ्याकडे त्याच्यापेक्षा जास्त जागा उपलब्ध असेल व त्याला जास्तीच्या जागेचे बांधकाम करायचे असेल, परंतु अतिरिक्त जागेच्या बांधकामाचा खर्च हा संबंधित लाभार्थ्याला स्वतः करावा लागणार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये काही शहरांमध्ये 2.5 पर्यंत चटई क्षेत्र निर्देशांक लागू आहे. या नियमाचा फायदा घेण्यासाठी निवड झालेले पात्र लाभार्थी एकत्र येऊन त्यांच्यानुसार बहुमजली इमारतीचे बांधकाम करता येईल रमाई घरकुल आवास योजनेमध्ये सोबत जोडलेल्या घरकुलाच्या आराखड्याप्रमाणे आणि नकाशा प्रमाणे बांधकाम करण्यात यावे.

रमाई घरकुल आवास योजनेसाठी कसा करायचा अर्ज

महाराष्ट्रातील ज्या पात्र नागरिकांना रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा आहे त्यांना सर्वप्रथम शासनाच्या आधिकारिक वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल, नोंदणी झाल्यावर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता, ऑनलाईन अर्ज आणि नोंदणी करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

  • रमाई घरकुल आवास योजनेंतर्गत ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी तुम्हाला प्रथम योजनेच्या आधिकारिक वेबसाईटवर जावे लागेल. यानंतर तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल
  • या होम पेजवर तुम्हाला तुमची नगरपरिषद किंवा ग्राम पंचायत निवडायची आहे
  • यानंतर होम पेजवर तुम्हाला रमाई घरकुल योजनेच्या ऑनलाइन अर्ज या पर्यायावर क्लिक करावे लागेल
  • यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल या पेजवर असलेल्या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरावी लागेल या प्रमाणे तुमचे नाव, जन्म तारीख, आधार नंबर इत्यादी विचारलेली संपूर्ण माहिती भरावी लागेल, या प्रमाणे सर्व माहिती भरून सबमिट बटनावर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला लॉगिन करावे लागेल, यासाठी लॉगिन पर्यायावर वर क्लिक करा
  • यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल या पेजवर तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड प्रविष्ट करवा लागेल
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन रमाई आवास योजना फॉर्म उघडेल या फॉर्म मध्ये तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरावी लागेल, विचारलेली सर्व माहिती भरल्यावर आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाईन अपलोड करावी लागेल
  • यानंतर पूर्ण तपशील पडताळणी करून तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल, या प्रमाणे तुमची या योजनेमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया संपूर्ण होईल.
  • रमाई घरकुल आवास योजना ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया
  • रमाई घरकुल आवास योजनेचा लाभ ज्या अनुसूचित जाती व नवबौद्ध नागरिकांना मिळवायचा आहे त्यांनी या योजनेला लागणारी आवश्यक संपूर्ण कागदपत्रे जमा करून सबंधित नगरपालिका, ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका कार्यालयात जाऊन रीतसर अर्ज भरून जमा करावा. रमाई आवास योजना अर्ज PDF खालीलप्रमाणे आहे.

रमाई आवास योजना लाभार्थी यादी पाहण्याची प्रक्रिया

  • रमाई घरकुल आवास योजनेमध्ये ज्या नागरिकांनी अर्ज केला आहे ते खालीलप्रमाणे प्रक्रियेचे अनुसरण करून ऑनलाईन लाभार्थी यादी पाहू शकतात
  • रमाई घरकुल आवास योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल
  • यानंतर तुम्हाला ‘’Awasoft’’ हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून ‘’Report’’ हा पर्याय निवडावा लागेल
  • यानंतर तुम्हाला ‘’Physical Progress Report’’ या पर्यायवर जाऊन त्यामध्ये दुसरा पर्याय ‘’House Progress Against The Target Financial Year’’ हा पर्याय निवडा
  • आता यानंतर नवीन पेज उघडेल या पेजवर तुम्हाला वर्ष निवडावे लागेल, यानंतर राज्य निवडावे, त्यानंतर तुमचा जिल्हा आणि तुचे गाव निवडावे लागेल, आता त्यानंतर समोर असलेला कॅप्चा कोड प्रविष्ट करा, यानंतर सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर स्क्रीनवर रमाई घरकुल आवास योजनाच्या अंतर्गत लाभार्थ्यांची यादी दिसेल, हि यादी तुम्ही डाऊनलोड सुद्धा करू शकता.
रमाई आवास योजना फॉर्म PDF Click Here
रमाई आवास योजना माहिती PDF Click Here
आधिकारिक वेबसाईट Click Here
महाराष्ट्र सरकारी योजना Click Here

निष्कर्ष :

रमाई घरकुल आवास योजना हि योजना आर्थिक दृष्ट्या मागास , अनुसूचित जाती , नवबौद्ध प्रवर्गासाठी त्यांना पक्की निवास स्थाने बनवून देणारी महाराष्ट्र शासणाची महत्त्व कांक्षी योजना आहे, या योजनेची माहिती जास्तीत जास्त लोक पर्यत पोचावा.योजने बद्दल नाही समस्या असल्यास मेल करा, मी अशा करतो कि सर्व माहिती तुम्हाला समजली असेल, धन्यवाद.

Leave a Comment