माझी कन्या भाग्यश्री योजना २०२३ | Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023

माझी कन्या भाग्यश्री योजना | Majhi Kanya Bhagyashree Yojana

मित्रांनो, राज्य सरकार व केंद्र सरकार देशातील, राज्यातील नागरिकांसाठी काही योजना राबवत असते, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शिक्षण, आरोग्य, समृद्धी यासाठी सरकारकडून बऱ्याच योजना राबवल्या जातात. त्याप्रमाणे समाजातील स्त्री वर्गासाठी, मुलींसाठी सरकारकडून बऱ्याच योजना राबवल्या जातात. त्यांच्या उच्च शिक्षणासाठी, चांगल्या आरोग्यासाठी त्यांना वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी महिलांचे समाजातील स्थान उंच व्हावे यासाठी महिलांचे सक्षमीकरण, मुलींचे सक्षमीकरण व्हावे यासाठी सुकन्या समृद्धी योजना, बालिका समृद्धी योजना, सीबीएससी उडाण योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना | Majhi Kanya Bhagyashree Yojana इत्यादी योजना मुलींच्या साठी राज्य सरकारने- केंद्र सरकार यांच्याकडून राबवले जातात.

 

माझी कन्या भाग्यश्री योजना माहिती

देशात व राज्यात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे म्हणजेच मुलींचे प्रमाण आज खूप कमी आहे. मुलीचे गुणोत्तर सुधारण्यासाठी महिला शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी १  एप्रिल २०१७  पासून “माझी कन्या भाग्यश्री योजना | Majhi Kanya Bhagyashree Yojana” सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये ज्या मुलीच्या पालकांनी मुलीच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केले आहे .तर सरकारकडून मुलीच्या नावाने ५० हजार रुपये बँक खात्यावर जमा करण्यात येतात.

त्याचप्रमाणे जर दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन केले तर कुटुंब नियोजनानंतर त्या दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी २५ हजार रुपये बँक अकाउंट मध्ये जमा केले जातात. या जमा केलेल्या रकमेवरतीमिळणारे व्याज हे प्रत्येकी सहा वर्षांनी मुलीला तिच्या खात्यामधून काढता येतील. वर्षे ६ व १२ या वर्षामध्ये फक्त व्याजाचीच रक्कम वापरता येईल . शेवटी १८ व्या वर्षी व्याजाची रक्कम व ५० हजार अशी एकत्रित रक्कम त्या मुलीला दिली जाणार आहे. त्या मुलीचे वय वर्ष अठरा पूर्ण झाल्यानंतर त्या मुलीला ही सर्व रक्कम दिली जाते.

Majhi Kanya Bhagyashree Yojana
Majhi Kanya Bhagyashree Yojana

Majhi Kanya Bhagyashree Yojana | माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अटी व शर्ती

 1. दारिद्र रेषेखालील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
 2. योजनेचा लाभ मिळण्यासाठी उत्पन्न मर्यादा एक लाखापर्यंत असावी.
 3. नवीन धोरणानुसार Majhi Kanya Bhagyashree Yojana | माझी कन्या भाग्यश्री योजनेची उत्पन्न मर्यादा साडेसात लाख रुपये इतकी करण्यात आली आहे म्हणजेच साडेसात लाख रुपये उत्पन्न असणारे लाभार्थी सुद्धा या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
 4. लाभ मिळवण्यासाठी मुलीच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे अनिवार्य असते.
 5. दोन मुलीच्या जन्मानंतर लाभ हवा असेल तर सहा महिन्याच्या आत कुटुंब नियोजन नसबंदी करणे अनिवार्य असते.
 6. माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये एकाच व्यक्तीच्या जर दोन मुले असतील तर त्या दोघींनाही लाभ देण्यात येईल.
 7. माझी कन्या भाग्यश्री योजनेचा  लाभ मिळण्यासाठी मुलीचे शिक्षण दहावी असावे  व मुलगी अविवाहित असावी .

Majhi Kanya Bhagyashree Yojana |माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी लाभार्थ्यांना अर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे 

 1. रहिवाशी दाखला पुरावा
 2. लाभार्थ्याचे आधार कार्ड
 3. आई व मुलीचे बँक पासबुक झेरॉक्स
 4. कुठुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र
 5. मुलींचे / मुलीचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र
 6. मोबाईल क्रमांक
 7. पासपोर्ट आकाराचे फोटो
 8. उत्पन्नाचा दाखला

माझी कन्या भाग्यश्री योजना | Majhi Kanya Bhagyashree Yojana महाराष्ट्र राज्य योजनेची उद्दिष्टे

प्रथम, म्हणजे समाजात मुलींच्या जन्मा बाबत सकारात्मक विचार निर्माण करणे, लिंग निवडीसाठी प्रतिबंध घालणे, मुलींच्या शिक्षण विषयी समाजाला प्रोत्साहन देणे. मुलींचे पालन पोषण करण्यासाठी प्रोत्साहन देणे. मुलींचे शिक्षण पूर्ण करणे जेणेकरून पुढे निर्माण होणारे दुसरी पिढी म्हणजे माता शिक्षित होईल आणि मुलगा आणि मुलगी हा भेदभाव कमी होण्यास मदत होईल शासनाचा हा उद्देश आहे. राज्यातील विषम लिंग अनुपात सुधारणे त्याचबरोबर मुलींचे प्रमाण वाढवणे तसेच मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत, उपाययोजना व उपयुक्त अशा सर्व योजना करणे या योजनेअंतर्गत मुलींना आर्थिक मदत देऊन मुलींना शिक्षित आणि स्वावलंबी बनवणे हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. 

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

Majhi Kanya Bhagyashree Yojana योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण, जिल्हा परिषद महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त महिला यांचे कार्यालय विनामूल्य उपलब्ध असतील. योजनेच्या अंमलबजावणी करिता अर्ज करताना अंतर्गत लाभाकरिता मुलीच्या पालकांनी मुलीचा जन्म झाल्यावर संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका या ठिकाणी मुलीच्या नावाची नोंदणी केल्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेवीकेकडे प्रपत्र अ किंवा ब मध्ये अर्ज सादर करावा.

राज्यातील इच्छुक लाभार्थी ज्यांना या अंतर्गत अर्ज करायचा आहे, त्यांना महाराष्ट्र शासन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्ज PDF डाउनलोड करावा लागेल. अर्ज डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल जसे की नाव, पत्ता, पालकांचे नाव, मुलीची जन्मतारीख, मोबाइल नंबर इ. सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे फॉर्मसोबत जोडावी लागतील आणि ती तुमच्या जवळच्या महिला व बाल विकास कार्यालयात जमा करावी लागतील.

कागदपत्र जमा केल्यानंतर अर्जदारांची कागदपत्र व वैयक्तिक माहिती पडताळणी केली जाईल. पडताळणी नंतर अर्जदार पात्र असतील, तर पुढील काही दिवसांमध्ये मुलीच्या बँक खात्यावरती लाभार्थी रक्कम हस्तांतरित करण्यात येईल.

निष्कर्ष :

Majhi Kanya Bhagyashree Yojana | माझी कन्या भाग्यश्री योजना हि सर्वसाधारण कुटुंबासाठी खूप महत्वाची योजना आहे. मुलींचे पालन पोषण करताना त्यांचे शिक्षण,आरोग्य,संगोपन योग्य व्हावे.लिंग असमानता कमी करणे.राज्यात मुलींचे प्रमाण वाढवून त्यांना साम्मानाने शिक्षण देणे.हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. मी अशा करतो मी दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल.काही अडचण असेल तर आपण शाषणाच्या अधिकृत संकेत स्थळावर जावून माहिती घेवू शकता. धन्यवाद.

हे पण पहा :

https://marathisarathi7.com/category/health/

https://marathisarathi7.com/web-stories/majhi-kanya-bhagyashree-yojana/

Leave a Comment