Shravan Bal Yojana 2023 | श्रावण बाळ योजना 2023

श्रावण बाळ योजना 2023 | Shravan Bal Yojana 2023

    मित्रांनो, आपण आज श्रावण बाळ योजना २०२३ | Shravan Bal Yojana 2023 या सरकारच्या योजनेची सविस्तर माहिती पाहूया. भारत देश हा कृषिप्रधान देश आहे त्यामुळे आपल्या कडे बहुतांश लोक हे ग्रामीण भागात राहतात, आणि त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक दुर्लभ आणि गरीब सामान्य नागरिक यांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. अशा लोकांसाठी महाराष्ट्र राज्य सरकार वेगवेगळ्या स्तरावर आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि वंचित निराधार नागरिक यांना आर्थिक सहाय्य म्हणून काही योजना बनवत असते. अशा बहुसंख्य कुटुंबाकडे जीवनावश्यक आणि मूलभूत वस्तूंची कमतरता असते. बहुसंख्य नागरिक दारिद्र रेषेखाली जीवन जगतात. अशा परिवारात  वृद्धापकाळात  नागरिकांना दुर्लक्षित केले जाऊ नये किंवा अशा ज्येष्ठ नागरिकांना समाजात जीवन जगणे कठीण होऊ नये यासाठी आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून महाराष्ट्र शासनाने श्रावण बाळ योजना राज्यात राबवली आहे.

  • श्रावण बाळ योजना २०२३ | Shravan Bal Yojana 2023 योजनेचे उद्दिष्ठ 

आपल्या राज्यातील वय वर्ष ६५ व ६५ वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिक यांना अर्थसहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबवली आहे. महाराष्ट्र सरकार द्वारे नेहमीच राज्यातील नागरिकांसाठी उपयोगी कल्याणकारी योजना या राबवल्या जातात या योजनेमध्ये समाजातील कमी उत्पन्न असलेले, वंचित नागरिक, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, त्याचबरोबर निराधार ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य  नागरिक यांचे जीवनमान सुधारणे व त्यांना आर्थिक सुरक्षित करणे तसेच त्यांच्या आरोग्य विषयी सुविधा निर्माण करून देणे त्यांना समाजात जगताना जीवन जगण्यासाठी पाठबळ दिले हे शासनाचे मुख्य उद्दिष्ट असते त्यासाठी श्रावणबाळ योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार दरमहा ६०० रुपये नागरिकांना वृद्धापकाळात निवृत्ती वेतन स्वरूपात देत आहे.

श्रावण बाळ योजना 2023 | Shravan Bal Yojana 2023
marathi sarathi
  • महाराष्ट्र श्रावण बाळ योजना| Shravan Bal Yojana 2023 वैशिष्ट्ये व स्वरूप

महाराष्ट्र श्रावण बाळ योजना २०२३  ही योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक आणि विशेष सहाय्य विभागाकडून राबवली जाते या योजनेप्रमाणेच निराधार आणि दारिद्र रेषेखालील नागरिकांसाठी संजय निराधार योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना शासनाद्वारे राबवल्या जातात.

  • श्रावण बाळ या योजनेत दोन श्रेण्या करण्यात आल्या आहेत .

  1. श्रेणी( अ) या योजनेअंतर्गत ६५  व ६५  वर्षावरील दारिद्र रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्या निराधार स्त्री पुरुष नागरिकांना श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेमधून ४००  रुपये प्रतिमहा  निवृत्तीवेतन देण्यात येते आणि याच लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे २०० रुपये निवृत्ती वेतन म्हणून देण्यात येते.तसेच
  2. श्रेणी (ब) ही योजना जी नागरिक खरोखर गरजू निराधार वयोवृद्ध आहेत  परंतु त्यांची दारिद्र्यरेषेखालील यादीमध्ये नोंद नाही व अशा नागरिकांचे वय ६५ व ६५ च्या वरील आहे. आणि त्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21 हजार रुपयाच्या आत आहे अशा वृद्ध नागरिकांना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत सहाशे रुपये प्रति महिना प्रति लाभार्थी निवृत्ती वेतन म्हणून  देण्यात येते.
  • श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आवश्यक कागदपत्र | Shravan Bal Yojana require documents

  1. वयाचा दाखला: ग्रामपंचायत किंवा नगरपालिका/ महानगरपालिका मधून अधिकृत जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा, ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक यांचा किंवा त्यावरील दर्जाच्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला वयाचा दाखला.
  2. दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव: दारिद्र्यरेषेखालील यादीमध्ये त्या व्यक्ती किंवा कुटुंबाचा समावेश असल्याचा अधिकृत पुरावा.
  3. रहिवाशी दाखला: ग्रामीण भागातील ग्रामसेवक, तलाठी, मंडळ, निरीक्षक, नायब तहसीलदार किंवा तहसीलदार यांचा दिलेला रहिवासी असल्याबाबतचा दाखला.
  • श्रावण बाळ योजना २०२३ | Shravan Bal Yojana 2023 साठी अर्ज कुठे व कसा करायचा :

महाराष्ट्र श्रावण बाळ योजना २०२३ | Shravan Bal Yojana 2023 या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र लाभार्थी उमेदवारांनी सर्वप्रथम आपल्या स्थानिक ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांच्याशी भेट देऊन प्रथम आपण या योजनेसाठी पात्र असल्याची माहिती घ्यावी, नंतर तेथेच आपण अर्जाची मागणी करून अर्ज लिहून देऊ शकता व त्यासाठी लागणारे कागदपत्राची पूर्तता करून अर्जासोबत जोडणी करून देऊ शकता. तसेच आपण महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सुद्धा ऑनलाईन पद्धतीने श्रावण बाळ योजना २०२३ साठी ऑनलाईन नोंदणी करू शकता.

conclusion:

महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार संयुक्तपणे सामान्य नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात योजना राबवत असते. पण या योजनाची माहिती सर्वसामान्य नागरी याच्या पर्यंत पोहचत नाही. महाराष्ट्र श्रावण बाळ योजना हि वयोवृध्द लोकासाठी एक संजीवनी आहे . वृद्धापकाळात आर्थिक संकटाशी लढत असताना हि योजना अशा नागरिकांना पाटबळ देण्याच महत्वपूर्ण काम करत आहे . माहिती मध्ये काही अडचण येत असेल तर महाराष्ट्र सरकार च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.धन्यवाद.

हे पण वाचा :

https://marathisarathi7.com/ayushman-bharat-yojana-maharashtra-2023/

https://marathisarathi7.com/web-stories/shravan-bal-yojana-2023/

2 thoughts on “Shravan Bal Yojana 2023 | श्रावण बाळ योजना 2023”

Leave a Comment